बांदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मंगळवार १० रोजी सभासद मेळाव्याचे आयोजन…

⚡बांदा ता.०९-: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बांदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मंगळवार दिनांक १० रोजी सायंकाळी ३.३० वाजता सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासद तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान व सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page