विशाल परब यांच्यासारखी माणसे नसती तर निलेश राणे राजकारणात दिसलेच नसते…

विशाल अभिष्टचिंतन सोहळा शुभारंभ प्रंसगी निलेश राणे यांचे भावूक उद्गार:विशालच्या मनातील इच्छा पुर्ण करण्यासाठी ताकदीने उभा राहण्याचे दिले आश्वासन..

⚡कुडाळ ता.०९-: राणेंनी सत्तेत असतांना आणि सत्तेत नसतांना संघर्षाचे दिवस बघितले. जास्त करुन संघर्षाचे दिवस अधिकच कारण माणसांच्या आयुष्यात चढ उतार नेहमीच येत असतात. निलेश राणेंच्या आयुष्यात तर उतारच खुप आले. मात्र या काळात जर विशाल परब यांच्यासारखी माणसे माझ्यासोबत नसती तर आज निलेश राणे राजकारणात दिसलेच नसते. त्यामुळे विशाल परब व्यक्ती म्हणून माझ्यासाठी इतरांपेक्षा खास आहे असे गौरवोद्गार आज माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांनी काढले.
तर विशाल परब यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही पण जे काय आहे ते पुर्ण करण्यासाठी भविष्यात आम्ही सर्व पुर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहू. तू राणे कुटुंबाच्या संगतीत आहे त्यामुळे तू निश्चिंत रहा. आज हिम्मतीने तु इतपर्यंत पोहचलास यापुढेही तुझी मेहनत अशीच सुरु ठेव नक्कीच तु तुझ्या ध्येयापर्यंत पोहचशील असेही ते म्हणाले. दरम्यान हे सांगतांना विशाल परब भावूक झाले. कुडाळ येथे आयोजित विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्ररमोद जठार,माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये ,दत्ता सामंत,रणजित देसाई,दादा साईल, प्रभाकर परब, सौ.बेबीका परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page