कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आतापासून सज्ज रहा- अरुण दुधवडकर….

फोंडा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश; भाजपाला बसला धक्का.

*💫कणकवली दि.२४-:* कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आतापासून सज्ज रहा असे आवाहन केले. तसेच संजय आग्रे यांनी अजूनही भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात असुन लवकरच त्यांना शिवसेना कुटुंबात सामील करुन घेणार असल्याचा भाजपला इशारा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे. फोंडा येथे भाजपचे पंचायत समिती शक्तीकेंद्र अध्यक्ष राजन नानचे, भाजप युवामोर्चा तालुका सरचिटणीस पवन भोगले, संजय नानचे, बापु गोसावी यांच्यासह अनेक भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अरुण दुधवडकर यांनी उपस्थित प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जि.प.सदस्य संजय आग्रे, संदेश पटेल, युवासेनेचे अँड.हर्षद गावडे, आबु पटेल, विभागप्रमुख बाबु रावराणे, अवि सापळे, राजु रावराणे, शाखाप्रमुख सुरेश टक्के, सिद्धेश राणे, प्रकाश मेस्त्री, दुर्वा गोसावी, बंटी उरणकर, पिंटू पटेल, शेखर लिंग्रस, निलेश भोगले, उदय रावराणे, भाई पिळणकर, सुभाष सावंत, गणेश बिडये आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page