प्रत्येक तालुक्यातील खालील दिलेल्या नंबरला संपर्क साधावा: विशाल परत मित्र मंडळ व भाजपच्या वतीने करण्यात आले आवाहन..
सावंतवाडी : भाजप युवा नेते, उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि गोव्यात जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो सावंतवाडीत होत आहे. विशाल परब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त 15 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 5.00 वाजता सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ज्युबिन नौटियालच्या चाहत्यांना खास बॅण्ड दिला जाणार त्या साठी प्रत्येक तालुक्यात बुकिंग सेंटर उभारण्यात आले असून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रत्येक संपर्क साधून तो फॉर्म भरून कार्यक्रमाचा बँड आपण त्या ठिकाणाहून मिळून घेण्याचे आवाहन विशाल परत मित्र मंडळ व भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

