मंत्री दिपक केसरकर याच्यासह राजन तेली, अर्चना घारे,मनिष दळवी यांनीही उपस्थित राहून वाहिली पुष्पांजली…
⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग माजी सैनिक संघटना, सैनिक स्कूल, सैनिक पतसंस्था तसेच कॅथलिक पतसंस्थेचे संस्थापक, सहकाररत्न पी.एफ.डान्टस यांच्या पार्थिवावर असंख्य ख्रिस्ती बांधव चाहता वर्ग, मित्रमंडळी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत सोमवारी न्यू खासकिलवाडा येथील सेमिस्ट्रीमध्ये प्रार्थना करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध संघटना संस्था व मान्यवरांकडून पुष्पांजली वाहण्यात आली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनीही उपस्थित राहून पुष्पांजली वाहिली.

