भोगवे किनारी पंधरा वर्षांनी लुटला एकत्रित येत आनंद
⚡वेंगुर्ले ता.०९-: सिंधुदुर्ग पोलीस दलात 2008 बॅच मध्ये भरती झालेले पुरुष व महिला अंमलदार यांनी पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन कार्यक्रम भोगवे तालुका वेंगुर्ला या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडले.
सन 2008 या वर्षी च्या बॅच मध्ये एकूण 89 पुरुष व महिला भरती झालेले होते सध्या या बॅचमधील 40 ते 45 पुरुष व महिला पोलीस अंमलदार सिंधुदुर्ग जिल्हातून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात बदली होऊन गेलेले आहेत.स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बदली होऊन गेलेले व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमणुकीत असलेल्या सर्व पोलीस अंमलदार यांनी मोठ्या उत्साहात अविस्मरणीय असा गेट-टुगेदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
गेट-टुगेदर साठी सिंधुदुर्ग ,यवतमाळ, उस्मानाबाद ,सातारा, सांगली ,कोल्हापूर, पुणे, मुंबई ,ठाणे ,अशा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात बदली होऊन गेलेले सर्व सन 2008 वर्षाचे बॅचमेंट एकत्र आल्याने कार्यक्रमाची अजून शोभा वाढली.
