निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरची बदली स्वार्थापोटी

*पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचा आरोप

*💫सावंतवाडी दि.०९-:* निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थानिक एम.बी.बी.एस डॉक्टरची करण्यात आलेली बदली ही स्वार्थापोटी असून तेथील बी.ए.एम.एस डॉक्टरच्या पदावर येणारी गदा लक्षात घेता स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार घडवून आणला असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. सदर बदली प्रकरणी स्थानिक आमदार यांच्या नावाचा घर वापर होत असून त्यांनी यामध्ये लक्ष घालावा तसेच संबंधित स्थानिक डॉक्टरला पुन्हा त्या ठिकाणी आजार करावे अन्यथा हा आम्ही गप्प बसणार नसून जिल्ह्यातील तीन्ही आमदारानी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. येथील पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये सभापती मानसी धुरी यांच्या उपस्थित ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी उपसभापती आहे शितल राहुल पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page