*अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांच्याकडे आला सोपवण्यात*
*💫ओरोस दि.०९-:* गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात असलेल्या शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचा हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर ओरोस पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या कोविड काळात त्याचा विपरीत परिणाम आरोग्य विषयक कामकाजावर होत आहे. त्यामुळे तातडीने त्याच्याकडील पदभार काढून घेवून त्या पदाचा पदभार अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा याकडे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे ४ मार्च २०२१ रोजी पत्राद्वारे लक्ष वेधले होते. या पत्राची दखल घेत आरोग्य उपसंचालक यांनी डॉ श्रीमंत चव्हाण यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार काढून घेत या पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांच्याकडे दिला आहे.
