जयप्रकाश चौकात गुडघाभर पाणी; पादचारी तसेच वाचालकांना पाण्यातून काढावी लागली वाट
⚡सावंतवाडी ता.०५-: शहरात आज सायंकाळ मुसळधार पाऊस झाला यात शहरातील मुख्य बाजारपेठेत जयप्रकाश चौक ते चंदुभवन परिसरात गुडघ्यावर पाणी साचले होते तर परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांना पाणी लागले दरम्यान पावसाळ्यात व्यवस्थित गटारे साफ न केल्यामुळे हा प्रकार घडला असा आरोप येथील व्यापाऱ्यांकडून करण्यात आला.
