संजय गांधी ‘ चे लाभार्थी तीन महिने अनुदानाविना…

बाबूराव धुरी यांची माहिती:योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्कम तत्काळ प्रयत्न करावे…

दोडामार्ग, ता.५-:
संजय गांधी निराधार योजनेसह वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने अनुदान मिळालेले नाही.समाजातील वंचित,उपेक्षित,निराधार, दिव्यांग,वृद्ध अशा व्यक्तींना सरकारकडून दरमहा विशिष्ट रक्कम त्यांचे जगणे सुकर व्हावे म्हणून दिली जाते.पण गेले तीन महिने ती रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही, अशी माहिती शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिली.

याप्रकरणी येथील तहसीलदार आणि संजय गांधी निराधार योजनेच्या समिती पदाधिकाऱ्यांनी ती रक्कम तत्काळ त्यांना दिली जावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कोकणातील गणेश चतुर्थी हा मोठा सण. या सणावेळी सुद्धा या लाभार्थ्यांच्या हाती दमडीही मिळाली नाही. त्यामुळे त्यापैकी काहींनी श्री धुरी यांना भेटून आपली कैफियत मांडली.त्यामुळेच त्यांनी तहसीलदार आणि समिती पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालून त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page