बांदा श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आळवाडाच्या अध्यक्षपदी साईशकुमार केसरकर…

बांदा/प्रतिनिधी
श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बांदा आळवाडाच्या अध्यक्षपदी साईशकुमार केसरकर यांची, उपाध्यक्षपदी प्रवीणराज हरमलकर यांची तर खजिनदारपदी क्षितिज भोगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री साईबाबा मठात आयोजित मंडळाच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत नऊ दिवस होणाऱ्या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रीतम हरमलकर, आप्पा धामापुरकर, सूर्यकांत निब्रे, मंदार धामापूरकर, प्रथमेश गवळी, विठ्ठल गवळी, प्रथमेश निब्रे, रवींद्र हरमलकर, सिद्धेश परब, दिपेश हरमलकर, रुपेश बांदेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो :-
पासपोर्ट.

You cannot copy content of this page