*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* प्राथमिक शिक्षकांना 12 वर्षे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर द्यावयाची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना जिल्हा शिक्षण विभाग व मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग यांनी 229 शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर केले असून शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने नव्याने मार्च 2021 पर्यंत 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव मागितले आहेत. याही प्रस्तावांना नजिकच्या कालावधीत मंजूरीसाठी जिल्हास्तरावर पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांनी स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी म्हणजेच चटोपाध्याय वेतनश्रेणी 237 प्रस्ताव जि प शिक्षण विभागाकडे गेले वर्ष दिड वर्ष मंजूरीच्या प्रतिक्षेत होते. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने दि 6 मे 2020ते दि 5 मार्च 2021 या कालावधीमध्ये सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दि 6/5/2020रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याशी झालेल्या चर्चेत वित्त विभागाकडून ज्या शिक्षकांनी अलाहाबाद हिंदी विद्यापिठाची पदवी संपादन केली अशा शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना त्रुटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने सदर विद्यापिठ हे मान्यताप्राप्त असल्याने वित्तविभागास सदर त्रुटी काढून टाकून प्रस्ताव मंजुरीसाठी शिफारस शिक्षणविभागाने करावी अशी मागणी करण्यात आली. दि 12/5/2020 रोजी जिल्हा शिक्षण विभाग व वित्त विभागात भेट देऊन वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव तालुकास्तरावरून किती आलेले आहेत व अजून किती तालुक्यांकडून प्रस्ताव येणे बाकी आहे या बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सन 2007 मध्ये सेवेत लागलेल्या शिक्षक बांधवांकडून वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव तालुकास्तरावरून मागविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. दि 21/7/2020रोजी मान मुख्यकार्यकारीअधिकारी व मान शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे जा क्र 42 ने अप्रशिक्षित शिक्षकांनाही वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मिळणेबाबत निवेदन देण्यात आले. दि 25/9/2020 रोजी मान मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग यांना संघटनेच्यावतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकृत भेट मिळण्यासाठी जा क्र 65 ने निवेदन देण्यात आले. दि 30/9/2020रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूरी बाबत प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने प्राथमिक शिक्षण विभागात माहिती घेतली असता कुडाळ -54,सावंतवाडी -37,कणकवली -29,वेंगुर्ला -35, दोडामार्ग -24, वैभववाडी -12,मालवण -25, देवगड 21 मिळूण 237 प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवले असल्याचे स्पष्ट झाले. यातील काही शिक्षकांचे प्रस्ताव 12 वर्षे सेवाकाळात विनावेतन रजा खंड पडलेला असल्यास असे प्रस्ताव जिल्हा वित्त विभागाने त्रुटी लावून तालुका गशिअ कार्यालयाकडे पाठवले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दि 6/10/2020 रोजी मान मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग व प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांना मराठी – हिंदी विषयाच्या परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळणेबाबत जा क्र 69 ने निवेदन देण्यात आले यावेळी मान उपमुख्यकार्यकारीअधिकारी मा.श्री राजेंद्र पराडकर यांची भेट घेऊन याबाबतचे सदरची अटीत सूट देत प्रस्ताव मंजूर करणेबाबत पाठपुरावा करण्यात आला. दि 8/10/2020रोजी मान शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग यांच्या दालनात प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या शिष्टमंडळासमवेत अधिकृत बैठक संपन्न झाली यावेळी मान राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे उपस्थित होते. या बैठकीत वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव जिल्हास्तरावर आलेले आहेत ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याबाबत शिक्षण विभागाकडून पाठपुरावा व्हावा यासाठी आग्रही भूमिका मांडण्यात आली.दि 19/10/2020 रोजी मान विभागीय आयुक्त कोकण भवन नवी मुंबई येथे राज्य शाखेच्यावतीने कोकण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेट घेऊन जा क्र 43 ने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी मान राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे यांचेसमवेत राज्य व जिल्हा स्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मान जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न मांडत असताना वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना मराठी – हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण असण्याची त्रुटी लावण्यात येत आहे याबाबत योग्य त्या सूचना निर्गमित होण्यासाठी विनंती करण्यात आली व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव त्वरित मंजूरीसाठी संबधित मान CEO ना सूचित करण्यात यावे अशी भूमिका मांडली.दि 8/12/2020रोजी मान मुख्यकार्यकारीअधिका
शिक्षक समितीच्या पाठपुराव्यामुळेच २२९ शिक्षकांना वेतनश्रेणी
