महिलांनी स्वतःसाठी स्वप्ने पहावीत

डॉ. सुमेधा नाईक : मालवण मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेचा महिला दिन विशेष कार्यक्रम

*💫मालवण दि.०९-:* महिला नेहमीच आपल्या पती, मुले व कुटुंबातील व्यक्तींसाठी स्वप्ने पाहत असतात किंवा त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटत असतात. मात्र महिलांनी स्वतःसाठी स्वतःची स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात बोलताना केले. महिला दिनानिमित्त मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेच्या वतीने वायरी येथील आर. जी. चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात मालवणातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या चारुशीला देऊलकर, उद्योजिका उर्मिला (माई) माणगावकर, आयकर सल्लागार प्रीती भाटिया, योग शिक्षिका जयश्री हडकर, प्रा. सुमेधा नाईक, शुभांगी कर्णिक, डॉ. नीता अभ्यंकर, पूनम खोत, फर्नांडिस, शनिता मसुरकर, मनीषा पारकर, राधिका कांबळी आदी व इतर उपस्थित होते. तसेच यावेळी जि. प. सदस्य हरी खोबरेकर, संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, अध्यक्ष आपा चव्हाण, राजा शंकरदास, विश्वास गावकर, दादा वेंगुर्लेकर, संजय हंजनकर, जगदीश तोडणकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी कातकरी समाजातील जंगलमय भागात २५० हुन अधिक बाळंतपण करणाऱ्या माई निकम, ऍड. रसिका हिवाळेकर, वैशाली गावकर, तनुजा नरे, श्रमीका लुडबे, नम्रता माडये, सौ. मिठबावकर, समिता लुडबे, आरोग्य सेविका आकांक्षा गोसावी, अर्चना तळवडेकर, हर्षदा तोंडवळकर, मंगला तळगावकर, गौरी सातार्डेकर, सौ. हंजनकर, दर्शना खरात, सौ. मेस्त्री, पिंकी पारकर, श्रीमती. प्रभुलकर, दिव्या तोडणकर, सौ. नागवेकर, सौ. तृप्ती मयेकर, सत्कार झाले यांचे. जान्हवी खोबरेकर, कविता मांजरेकर, दीक्षा लुडबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सुमेधा नाईक यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले यावेळी चारुशीला देऊलकर, योग शिक्षिका सौ. जयश्री हडकर, प्रीती भाटिया डॉ. अभ्यंकर, राधिका कांबळी यांनीही विचार मांडत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले.

You cannot copy content of this page