Headlines

आशिये ग्रामपंचायत नूतन वास्तूचा ४ ऑक्टोंबरला लोकार्पण सोहळा

आशिये ग्रा.पं.च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिदल महोत्सवाचे आयोजन..

⚡कणकवली ता.०३-: आशिये ग्रामपंचायत स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहे, या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिदल महोत्सवाचे ४ ऑक्टोंबरला करण्यात आले आहे.त्यानिमित्त आशिये ग्रामपंचायत नूतन वास्तूचा लोकार्पण भाजपा आ.नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.तसेच आशिये पर्यटन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच महेश गुरव यांनी दिली.

आशिये गाव संस्कृतीचा झेंडा घेऊन….. जगाच्या नकाशावर पोहचिण्यासाठी आशिये पर्यटन संकेतस्थळाच्या माध्यमातून गावातील पारंपारिक लोककला व विविध होणारे कार्यक्रम लोकांपर्यत पोहचविण्यात येतील,अशी संकल्पना आहे.
त्यानिमित्त कार्यक्रम सकाळी १० ते १२ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ ते ३ वाजता स्थानिक भजने,दुपारी ३ ते ४ वाजता ‘रंग मातीचे’सादरकर्ते: स्थानिक कलामंच आशिये,सायंकाळी ४ वा. ग्रामपंचायत नूतन वास्तू लोकार्पण सोहळा आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांची असणार आहे.

तरी आशिये ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच महेश गुरव,उपसरपंच संदीप जाधव, ग्रामसेवक राकेश गोवळकर व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.

You cannot copy content of this page