२ लाख 55 हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद
⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथे काल मध्यरात्री एक च्या सुमारास घरातील अंगणात वीज मिटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्याच अंगणात उभे असलेल्या तेजस सहदेव बोभाटे यांच्या मालकीच्या
तीन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान यामध्ये दोनच दिवसांपूर्वी बजाजची सिटी ९९ हजार ५०० रुपये किंमतीची दुचाकी नवीन दुचाकी खरेदी केली होती.ती ही दुचाकी जळून खाक झाली आहे. यामध्ये एकूण दोन लाख 55 हजार 500 रुपये नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी तलाठी सुदर्शन अलकुटे, फोंडाघाट आऊट पोस्टचे हवालदार माने , नांदगाव विज वितरण विभागाचे अभियंता श्री पंडित,तोंडवली पोलिस पाटील विजय मोरये आदी उपस्थित होते.
या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.
