निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोंडकर यांचे 1 ऑक्टोंबर ला मलवणात व्याख्यान…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली माहिती.

⚡कणकवली ता.३०-: राष्ट्रीय पुरस्कार विजेते, निसर्गोपचार तज्ञ व सुप्रसिध्द व्याख्याते स्वागत तोंडकर यांचे १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमात रुग्णांना मोफत सल्ला निसर्ग उपचार तज्ञ,व्याख्याते स्वागत तोंडकर देणार आहेत.रुग्णाच्या समस्या जाणून घेत मोफत सल्ला देणार आहेत,अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना व माजी आ.परशुराम उपरकर यांच्यावतीन करण्यात आले आहे

रुग्णांच्या समस्याबाबत आरोग्य धनसंपदा हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. निसर्ग उपचार,घरघुती उपचार करुन आजार बरे होवू शकतात.बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे आरोग्य उपचार सेवा स्वागत तोडकर देत आहेत.

You cannot copy content of this page