⚡कुडाळ ता.२८-: मागील दोन महिन्यांच्या काळात सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये जाण्याचे काम आम्ही केले आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन जे राष्ट्रवादीपासून अलिप्त होते त्यांच्याशी संपर्क केला, अशी माहिती आज कुडाळ येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली.
कुडाळ येथे आज राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यकारणीची संपूर्ण माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पाठवण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले की, पक्षाच्या जडणघडणीपासूनचे काही कार्यकर्ते अलिप्त होते. २०१३ पासूनचे राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेत तिथेच आहेत. मात्र, ते प्रवाहात नव्हते. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले असून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. येत्या काळात हे सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भरघोस निधी दिला आहे. अजितदादांना बऱ्यापैकी लोकमत आहे अशी माहिती अबिद नाईक आणि काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संपर्कप्रमुख हसन मुश्रीफ सिंधुदुर्गात : पितृपक्ष संपल्यानंतर संपर्कप्रमुख हसनमुश्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी पक्षाचा मोठा मेळावा सुद्धा होणार असल्याची माहिती यावेळी अबिद नाईक यांनी दिली.
दिवाळीत अजितदादा सिंधुदुर्ग जिल्ह्यात :
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार दिवाळीत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात येणार आहेत.
प्रफुल्ल सूद्रिक आमच्यात आल्यास आनंद: युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक मागील दोन महिन्यांपासून पक्षाच्या बैठकीला उपस्थित नाहीत. दुसऱ्या गटावर त्यांची नाराजी असेल आणि ते इकडे येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. सुद्रिक आमच्याबरोबर होते पण मागील दोन महिने ते आमच्याशी संपर्क नाहीत अशी माहिती अबिद नाईक यांनी दिली.
यामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून असलम खातीब, अनिस नाईक, प्रशांत साटम, निशिकांत कडुलकर, अमित केतकर, सर्वेश पावसकर, सुधाकर करले, केदार खोत, शैलेश लाड, गणेश चौगुले, सचिन अडुलकर, दिनेश म्हडगुत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये
उपाध्यक्ष सुभाष सावंत, एम. डी. सावंत, सरफराज नाईक, संदीप राणे,
जिल्हा सरचिटणीस : सावळाराम अणावकर
जिल्हा सचिव : धर्माजी बागकर, प्रभाकर चव्हाण, प्रसाद कुळकर्णी, राजेंद्र धारपवार, सतीश पाताडे, विनायक जोईल, अशोक सावंत, सुशील चमणकर, आबा टाककर, पप्पू जाधव.
प्रांतिक सदस्य : विलास
गावकर, दिलीप वर्णे, प्रकाश कोयंडे, सुनील भोगटे, सत्यजित धारणकर, डॉ. अभिनंदन मालंडकर.
तर कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, देवगड : रशिद खान, वैभववाडी : वैभव रावराणे, मालवण : नाथ मालंडकर, कुडाळ : रामचंद्र सावंत, वेंगुर्ले: संदीप पेडणेकर, सावंतवाडी: उदयराव भोसले आणि दोडामार्ग : सत्यवान गवस अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर कणकवली शहर अध्यक्षपदी इमरान शेख आणि वेंगुर्ला शहराध्यक्षपदी सूरज परब यांची नियुक्ती केली आहे.
