सिंधुदुर्ग उबाठा जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रियाज खान यांची निवड…

⚡बांदा ता.२७-: शिवसेनेच्या (उबाठा) सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते रियाज खान यांची निवड करण्यात आली आहे. मालवण येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते खान यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. गेल्या वर्षभरात खान यांनी सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष म्हणून संघटना वाढीसाठी भरीव काम केल्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पदोन्नती केल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले.
रियाज खान हे अल्पसंख्यांक सेलचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी वर्षभरात जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवीत आंदोलने देखील केली आहेत. त्यांनी संघटना वाढीसाठी देखील विविध उपक्रम राबविले आहेत. पक्षाच्या विविध लोकोपयोगी योजना त्यांनी राबविल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली.
अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद बटवाले यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना संघटना वाढीसाठी वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे यावेळी खान यांनी सांगितले.

You cannot copy content of this page