नाभिक व्यावसायिक सहकारी पतसंस्थेची ३० रोजी बैठक

⚡मालवण ता.२७-: श्री संत सेना नाभिक व्यावसायिक सहकारी पतसंस्थेची बैठक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील खरेदी-विक्री संघ येथे आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन विजय चव्हाण, व्हाईस चेअरमन शंकर चव्हाण, संचालक भाऊ चव्हाण, आनंद आचरेकर, शंकर पिंगुळकर, हनुमंत कारिवडेकर, वामन आचरेकर, स्नेहा आचरेकर, बा. स. लाड, गणेश चव्हाण, सचिव प्रज्ञा चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी सिंधुदुर्ग नाभिक संघटना अध्यक्ष जगदिश चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, सचिव जग्गू टेलर आदी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव प्रज्ञा चव्हाण व चेअरमन विजय चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page