Headlines

महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद होणार ही अफवा…

मंत्री दिपक केसरकर:अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये…

⚡सावंतवाडी ता.२७-: महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद होणार अशी अफवा पसरलेली जात आहे मुळात अशा प्रकारचा कोणताही धोरणात्मक निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला नाही त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे स्पष्टोती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.

तर चांगले कामे काय आहेत याची माहिती घ्या आणि नंतरच अफवा उठवा असे ठिकाणी विरोधकांवर केली.
राज्यातील अनेक शाळा बंद होणार आहेत असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत मंत्री केसरकर यांनी पंतवाडीत पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले. यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर उपस्थित होते. ते म्हणाले राज्यात अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही मी स्वतः शालेय शिक्षण मंत्री आहे आणि माझ्या मानतेनुसारच असे प्रकारचे निर्णय होत असतात परंतु असा कुठलाही धोरणात्मक निर्णय अद्याप पर्यंत घेण्यात आलेला नाही त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये विरोधक चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवीत आहेत परंतु एकही शाळा बंद होणार नसून कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय केला जाणार नाही.
तर दुसरीकडे दर डोंगराळ व खेड्यापाड्यातील शाळा दुरुस्तीबाबत कंपन्यांना सीएसआर फंड वापरून त्या शाळा दुरुस्त करण्याबाबत केल्या आहेत याचा अर्थ त्या शाळांची मालकी किंवा त्यांच्या ताबा त्या कंपन्यांकडे जाणार नाही सर्व ताबा हा शासनाकडेच राहणार असून पूर्वी अशा प्रकारचा फंड कंपन्याकडून आरोग्य किंवा शिक्षणावर खर्च केला जात असे परंतु हे सर्व पैसे एका संस्थेकडे जात होते या संस्था शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करत होत्या परंतु त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होत नव्हता त्यामुळे आम्ही थेट कंपन्यांनाच याबाबतचा खर्च करण्याच्या सूचना केल्या आहेत एकूण याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून शाळा ही व्यवस्थित होणार आहेत मुळे चुकीचे गैरसमज सर कोण पसरत असतील तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये

You cannot copy content of this page