आठवडा बाजाराची जागा सुद्धा धोकादायक…

नगर पालिका प्रशासनाने धोकादायक झाडे तोडावीत:
चराठा उपसरपंच अमित परब यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील राजवाडा समोर घडलेली घटनेमुळे सावंतवाडी आठवडा बाजाराची जागा देखील धोकादायक बनली आहे. त्या ठिकाणी झाडे वाढली असून त्यामुळे अपघाताची घटना नाकरता येत नाही. त्यामुळे तात्काळ झाडी तोडावी अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास याला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा चराठा उपसरपंच अमित परब यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल राजवाडा समोर भेडले माडाचे झाड पडून दोन युवकांचा दुर्देवी अंत झाल. त्या पार्श्वभूमीवर आज अमित परब यांनी याबाबत आठवडा बाजाराला देखील तेथील झाडे धोकादायक बनल्याचे सांगत याबाबत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करून धोकादायक असलेली झाडे तोडण्यात यावीत ,अशी मागणी त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page