भजनावरून परतताना भेडले माडाचे झाड पडल्याने दोन युवकांचा मृत्यू…

रात्री राजवाड्यासमोर घडली हृदय पिळवटणारी घटना:माणगाव आंजीवडे गावावर दुःखाचा डोंगर

⚡सावंतवाडी ता.२७-: भजन करून पुन्हा आपल्या घरी परतत असताना माणगाव अंजिवडे येथील राहत असणाऱ्या दोन युवकांचे रात्री राजवाड्यासमोर भेडले माडाचे झाड पडून मृत्यू झाल्याची घटना घडले.राहुल प्रकाश पंदारे (वय24) व संभाजी दत्ताराम पंदारे वय (21) गवळीवाडी असे मृत्यू दोन्ही युवकांची नावे आहेत. दरम्यान त विज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील दोघेही मृत युवक गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून दुचाकीने परत जात असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष संजू परब यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ पालिका व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु अंगावर झाडाचा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला १ मृतदेह बाहेर काढण्यात आला.

You cannot copy content of this page