*जागतिक महिला दिनानिमित्त शहर महिला भाजप कडून अंकुर महिला केंद्रात धान्य वाटप

भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला उपक्रम*

*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी शहर महिला भाजप कडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अंकुर निवारा केंद्रात धान्य वाटप केले आहे. या कार्यक्रमासाठी भाजप मंडल शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी मदत केली आहे. भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, नगरसेविका दिपाली भालेकर, मिसबा शेख, ज्योती मुद्राळे, मेघना साळगावकर, निर्मला यादव, सविता टोपले, परिणीती वर्तक, बेला पिंटो, अदिती दळवी, प्राजक्ता मुद्राळे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page