शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची…

प्रा. वैभव खानोलकर:परबवाडा येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न…

वेंगुर्ला प्रतिनिधी-जनता मित्रमंडळ हे सातत्यपूर्ण विद्यार्थी गौरव करीत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पदी आहे. विद्यार्थी घडविताना शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.

  जनता मित्र मंडळ शाखा मुंबई आणि वेंगुर्ला यांच्यावतीने नुकताच परबवाडा शाळा नं.१ येथे  परबवाडा येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. यात पहिली ते बारावी पर्यंतच्या परिक्षेत प्रथम तीन क्रमांकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, मुख्याध्यापक झोरे, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी, जतना मित्रमंडळाचे मुंबई अध्यक्ष, परबवाडा अध्यक्ष व ग्रामस्थ उउपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहदेव परब यांनी केले.
You cannot copy content of this page