राजन तेलींची घरोघरी गणेश दर्शनावर भर…

विधानसभेची तयारी: पुन्हा एकदा नशीब आजमाविण्याचा प्रयत्न..

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील विधानसभा मतदारसंघात भाजपातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. गणेश दर्शनाच्या निमित्ताने हे पदाधिकारी घरोघरी भेट देत आहेत .त्यांच्यासमावेत भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर, प्रथमेश तेली आदी कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या आहेत,

श्री तेली हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून भाजपमधून आपले नशीब आजबावण्याचा प्रयत्न करत आहेत.दोन वेळा अपक्ष निवडणूक लढवून दोन नंबरचे मतं त्यांनी मिळवली होती. आता पुन्हा एकदा ते या ठिकाणी निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्री तेलींनी घरगुती गणेश दर्शनाला जास्तीत जास्त महत्व दिले आहे. श्री तेली खुद आपल्या घरात गणेश दर्शनासाठी येत असल्यामुळे अनेक ग्रामस्थांमधून समाधानाचे वातावरण आहे. श्री. तेली यांनी सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग मतदारसंघातील ग्रामस्थ तसेच कार्यकर्तच्या घरी जाऊन आपली उपस्थिती दर्शवली आहे.

You cannot copy content of this page