जकातवाडी येथे कुत्र्यांनी पाठलाग करून संबराच्या पिल्लाला तलावात घेरले…

दुपारची घटना: चैतन्य मसुरकर व अजय मसुरकर यांनी वनविभागाला पाचरण करत संबराच्या पिल्लाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले..

⚡आंबोली,ता.२२-: येथील जकातवाडी येथील तलावात कुत्र्यांनी पाठलाग करून संबराच्या पिल्लाला तळ्यात पाण्यात घेरले होते.कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आणि सावजाची शिकारीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चैतन्य मसुरकर आणि अजय मसुरकर यांनी वनविभागाला कळवले यावेळी प्रथमेश गावडे, वनविभागाचे वनरक्षक श्री गाडेकर,आणि मंगेश सावंत यांनी कुत्र्यांना हाकलून लावत संबराच्या पिल्लाला सोडवले.

ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.आठ दिवसापूर्वी अवघ्या दहा दिवसाचे पिल्लू कुत्र्यांच्या पाठलागामुळे बाजारवाडीत दुर्वांकुर हॉटेल मध्ये घुसले प्रथमेश गावडे याने त्या पिल्लाला वन उद्यानात सोडले.पिल्लासाठी हंबरडा फोडणारी आई बिलगली होती मात्र ओरडण्यामुळे दुधाचे पिल्लू पुन्हा भेटली.जंगलात वाघ आणि बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे सांबर वस्तीजवळ राहू लागले आहेत मात्र कुत्र्याच्या तावडीत पिल्लू सापडण्याच्या घटना घडत आहेत.

You cannot copy content of this page