सरपंच बाबू शेटये व गुलाबराव गावडे यांचा पाठपुरावा; पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून केली होती मागणी…
आंबोली, ता.२२: चौकुळ येथील सेल्फी पॉईंट साठी ५ लाख रुपये सिंधू रत्न योजनेतून मंजूर झाले आहेत.चौकुळ ग्रामपंचायत सरपंच बाबू शेटये आणि गुलाबराव गावडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.पक्षी निरीक्षण आणि चौकुळ चे पर्यटन वाढण्यासाठी पर्यटकांना वेगळे काहीतरी निसर्गातील दाखवण्याचा दृष्टीकोनातून ही संकल्पना मांढण्यात आली होती.पापडी पुलाजवळ गॅलरी उभारण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.सिंधुरत्न योजनेतून या योजनेसाठी ५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी दिली.
