लोरे येथे सेल्फी पॉईंटचा शुभारंभ

आम. नितेश राणे यांनी केले कौतुक

⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सेल्फी पॉइंट (सुंदर माझं गाव लोरे) माजी सभापती मनोज रावराणे, लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या संकल्पनेतून लोरे नंबर १ या गावामध्ये राबविण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आम. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्यातील ग्रामीण भागात प्रथमच सेल्फी पॉइंट बनवण्याचा मान लोरे ग्रामपंचायतने मिळवला असून लोरे गाव जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असल्याचे आमदार नितेश राणे लोरे ग्रामपंचायतीचे कौतुक करताना म्हणाले. गावातील सरपंच आणि ग्रामस्थ यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला प्रसंगी सिंधुदुर्ग कृषी बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे माजी सभापती कणकवली मनोज रावराणे,सरपंच
अजय रावराणे ,उपसरपंच
सुमन गुरव ,नरेश गुरव, सुनील रावराणे,अनंत रावराणे,बाबा रावराणे,आणि गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page