खामदेव नाका येथे भरधावं वेगात येणाऱ्या कारने पुढच्या कारला दिली जोरदार धडक…

पोलिस घटनास्थळी दाखल :महिलेसह ११ महिन्याच्या बाळाला किरकोळ दुखापत..

बांदा ता.२१-: मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने पाठीमागून भरधावं वेगात येणाऱ्या कारने पुढच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात पुढे असणाऱ्या कार मधील महिला व ११ महिन्याच्या बाळाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात १ वाजण्याच्या सुमारास घडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

You cannot copy content of this page