बबन साळगावकर: मंत्री दीपक केसरकारांकडे केली मागणी
⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक शाळा स्थानिक नगरपरिषदांकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.दरम्यान. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या कर शैक्षणिक क्षेत्रामध्ये योग्य ठिकाणी खर्चही होईल मुला मुलींसाठी चांगल्या सुविधाही नगरपरिषद निर्माण करण्यास सुलभ होईल तरी विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी या मागणीचा विचार करून नगर परिषदेने दिलासा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले की शिक्षण क्षेत्रामध्ये नगरपरिषदेना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी यापूर्वी नगराध्यक्ष दीपक केसरकर असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे अशा पद्धतीची पूर्वी मागणी केलेली आहे
आता तस्वतः केसरकर हे शिक्षण मंत्री असल्याने त्यांनी तात्काळ मंजुरी देऊन प्राथमिक शिक्षण संस्था नगरपरिषदेंकडे वर्ग करावे असे ही साळगावकर यांनी आपल्या पत्रकात म्हणाले.
