शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर:ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी केली होती मागणी…
⚡सावंतवाडी ता.२१-: ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे (लेखाशिर्ष २५१५ १२३८) या योजनेंतर्गत डेगवे आंबेखणवाडीत दोन रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाल्याचे डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी सांगितले. राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
डेगवे आंबेखणवाडी रस्ता ते प्रकाश देसाई यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे ९ लाख आणि डेगवे आंबेखणवाडी भोमभरड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ६ लाख असे मिळून दोन्ही रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याबद्दल डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी
आंबेखणवाडीवासियांच्यावती ने मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहे.
