⚡मालवण ता.२०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेना सिंधुदुर्गतर्फे गणेशोत्सवानिमित्त गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरी विराजमान झालेल्या गणपती व गौरी यांच्या सजावटीचा एक सेल्फी व एक व्हिडीओ काढून आपल्या नाव व पत्त्यासह ९४२१९७११५९ या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सऍपद्वारे दि. २३ सप्टेंबर पर्यंत पाठवायचा आहे. या स्पर्धेचा निकाल २५ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रू. ५५५५, रू. ४४४४, रू. ३३३३ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ८६९८६०८३७४, ९३२५९४२७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, गणेश भक्तांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन युवतीसेनेच्या जिल्हा विस्तारक रुची राऊत यांनी केले आहे.
