पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली सावंत कुटुंबीयांची भेट
⚡सावंतवाडी ता.१८-: १९ मराठा बटालियन जेसीओ सुभेदार शहीद सुनील राघोबा सावंत यांच्या कुटुंबीयांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांत्वन केले. कारीवडे भैरववाडी येथे जाऊन त्यांचे वडील, पत्नी, मुलगा व मुलगी यांची विचारपूस करून धीर दिला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाई सावंत,राजू राऊळ, माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
