*सिंधुदुर्ग विभागातील वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गसेवक मोहिमेत सहभागी*
*💫कुडाळ दि.२४-:* जागतिक वारसा दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग यांच्यातर्फे सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती, अभ्यास आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग विभागातून वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गसेवक सहभागी झाले होते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ज्यांनी एकही रविवार न थांबता २५० गड किल्ले भ्रमंती केली असे गणेश रघुवीरर, सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागचे नितीन पानवलकर, मुंबई विभागचे दुर्गसेवक विल्सन रॉड्रिग्ज, मुरबाड विभागचे रूपेश मगर, विवेक गावडे, ज्ञानेश्वर राणे, सुनील राऊळ, सिद्देश परब, रोहन सावंत, गणेश जाधव, भास्कर मसदेकर, सुधीर राऊळ, केदार देसाई, प्रज्योत खडपकर, शुभम खडपकर, ऋतूराज खडपकर, अनिकेत चव्हाण तसेच सिंधुदुर्ग विभागातून वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गसेवक यावेळी उपस्थित होते. किल्याची भ्रमंती आणि अभ्यास करत असताना किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. यात गडावर वाढलेला चारा, गवत काढण्यात आले. गडावर असलेला प्लास्टिक बॉटल, कागदी कचरा उचलू गड स्वच्छ करण्यात आला. यावेळी किल्याबद्दल गणेश रघुवीर यांनी मार्गदर्शन करून माहिती दिली. यावेळी पर्यटक आणि तेथील ग्रामस्थांना सिंधुदुर्ग किल्ला किंवा इतर किल्ले यांचा आदर करा, पावित्र्य जपा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी रक्त सांडून गड किल्ले उभारले राखले अशा गडांचा अनादर करू नका, त्यावर घाण करू नका, कचरा फेकू नका, खाण्याच्या वस्तू, पाणी बॉटल इतरत्र फेकू नका ती कचराकुडींत फेका जर कचरा कुडीं नसेल तर आपल्या बॅगमध्ये ठेवा, असे आवाहन पर्यटक व ग्रामस्थांना सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागतर्फे करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छतामोहिम झाल्यानंतर पद्मदुर्ग, मोरयाचा धोंडा, राजकोट, सर्जेकोट स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.