भाजपाच्यावतीने घेण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेच बक्षीस वितरण संपन्न…

माजी खासदार डॉ. निलेश राणेंच्या हस्ते बक्षीस प्रदान ,अजय गोंदावळे यांची संकल्पना

सावंतवाडी दि.२४-:* येथील शहर भाजप मंडलाच्यावतीने आयोजित नरकासुर स्पर्धेत खुल्या गटात हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा यांनी तर बाल गटांमध्ये भटवाडी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेत सहभागी सर्वच मंडळाने अक्राळविक्राळ नरकासुर बनवून स्पर्धेमध्ये चुरस निर्माण केली होती.

सावंतवाडी शहरांमध्ये दरवर्षी मोती तलावाच्या काठावर नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते मात्र कोरोनाचे सावट लक्षात घेता या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मात्र शहराच्या मंडळाच्यावतीने शहर अध्यक्ष अजय गोंदावले आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नरकासुर स्पर्धा आयोजित करतात शहरातील नरकासुर बनवणाऱ्या विविध मंडळांमध्ये स्फूर्ती निर्माण केली होती सर्वांनी गोंदावले यांच्याकडून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या स्पर्धेमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये बाल गटात 22 मंडळाने तर खुल्या गटामध्ये 11 मंडळाने सहभाग दर्शविला होता.स्पर्धेचे परीक्षण एडवोकेट अनिल निरवडेकर, दादा मालवणकर, सतीश पाटणकर व पत्रकार ऍड संतोष सावंत यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे बालघट प्रथम क्रमांक भटवाडी मित्र मंडळ अळवणी भटजी दत्त मंदिर, द्वितीय क्रमांक विभागून श्री देव महापुरुष मित्र मंडळ गोठण मधला आवाट तर झपाटा मित्र मंडळ काझी शहाबुद्दिन हॉल सबनीस वाडा, तर तृतीय क्रमांक विभागून प्रज्वल मित्र मंडळ यांनी पटकावला उत्तेजनार्थ मोरया ग्रुप जिमखाना मैदान, साई कला क्रीडा मंडळ गावडेशेत, शिरोडा नाका मित्र मंडळ सालईवाडा यांना देण्यात आला.
खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा, द्वितीय क्रमांक विभागून झकास मित्र मंडळ वैश्यवाडा तर आत्मेश्वर युवक मित्र मंडळ माठेवाडा यांना देण्यात आला तृतीय क्रमांक रॉयल ग्रुप चितारआळी, वैश्यवाडा मित्र मंडळ मारुती मंदिर, यांना तर उत्तेजनार्थ मध्ये सालईवाडा मित्र मंडळ मिलाग्रीस हायस्कूल व नरसोबा मित्र मंडळ जुना बाजार यांना विभागून देण्यात आला.
यावेळी भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, शहर मंडल युवा अध्यक्ष संदेश टेमकर, शहर प्रवक्ते केतन आजगावकर, दिलीप भालेकर, अमित परब, प्रसन्न राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page