राज्याध्यक्ष देवीदास बसस्वदे यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली माहिती
*💫ओरोस दि.२४-:* २६ नोव्हेबर रोजी होत असलेल्या राज्यव्यापी सरकारी-निमसरकारी एक दिवशीय संप आंदोलनात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सहभागी होणार नाही, अशी माहिती राज्याध्यक्ष देवीदास बसस्वदे यानी दिली आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने फेब्रुवारी २० मध्ये जंतरमंतर नवीदिल्ली येथे जुनी पेन्शनसाठी राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात आलेले आहे. तसेच इतर प्रलंबीत प्रश्नांसाठी राज्य शासनाने १० नोव्हेंबर रोजी संघटनेला चर्चेसाठी निमंत्रित केले होते., परंतु अनेक विभागात होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यामुळे ही बैठक डिसेंबर मध्ये होईल त्यात महत्वाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे.कोरोना जागतिक महामारीशी शासन, प्रशासन मुकाबला करत असतांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने सामाजिक उत्तरदायित्व समजून या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, असे अध्यक्ष बसस्वदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यानी प्रसिद्धि पत्रकात नमूद केले आहे.