आरोग्य विभागात खळबळ
सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* ओवळीये खांदारेवाडी ( ता. मालवण ) येथील रहिवासी दिव्या आबा खांदारे (१८) हिचे सोमवारी निमोनिया आजाराने निधन झाले. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. दिव्या ही कसाल येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत होती. यामुळे खांदारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिव्या खांदारे हिचा निमोनियामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. दिव्या ही सदा हसतमुख होती. अत्यंत गरीब कुटुंबातील असलेली दिव्या हिच्या जाण्याने कसाल दशक्रोशिमधे हळहळ व्यक्त होत आहे. दिव्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.