गांजा बाळगल्या प्रकरणी मालवण येथील दोन तरुणांची जामीनावर मुक्तता

⚡मालवण ता.१६-: कुंभारमाठ येथील एसटी निवारा शेडमध्ये सिगरेट मधून गांजाचे सेवन करतांनाच गांजा जवळ बाळगल्याच्या संशयावरून न्यायालयीन कस्टडीत असलेल्या तमास फॅलीस ब्रेगान्झा (वय-२४) रा. दांडी आवार व ओंकार मनोहर बांदलकर (वय-२३), रा. मालवण या दोनही संशयीताना प्रत्येकी रुपये साडेसात हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे . संशयितांतर्फे ॲड. स्वरुप पई व अंबरीष गावडे यांनी मे. न्यायालयात बाजू मांडली.

कुंभारमाठ येथील एसटी निवारा शेडमध्ये सिगरेट मधून गांजाचे सेवन करतांनाच गांजा जवळ बाळगल्याच्या संशयावरून न्यायालयीन कस्टडीत असलेल्या तमास फॅलीस ब्रेगान्झा (वय-२४) रा. दांडी आवार व ओंकार मनोहर बांदलकर (वय-२३), रा. मालवण या दोनही संशयीताना मालवण पोलिसांनी ताब्यात घेत दिनांक १४/०९/२०२३ रोजी अटक केली होती.
त्यांच्याकडील गांजा सदृश्यपदार्थ मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांना मालवण न्यायालयात दिनांक १४/०९/२०२३ रोजी हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्यानुसार त्यांची रवानगी न्यायालीन कोठडीत करण्यात आली होती.

याप्रकरणी संशयितांतर्फे दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जाची सुनावणी होऊन मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी साहेब मालवण यांनी दोन्ही संशयितांना दिनांक १५/०९/२०२३ रोजी प्रत्येकी रुपये ७५००/- चा जामीन मंजूर केला. संशयितांतर्फे ॲड. स्वरुप पई व अंबरीष गावडे यांनी मे. न्यायालयात बाजू मांडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंबिंग ऑपरेशन कर्तव्यादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. सुतार, एस. एल. जाधव, पोलीस उपनिरीक्षक एन. आर. नरळे, पोलीस हवालदार राजन पाटील, एस. जी. पांचाळ हे रात्री गस्त घालत होते. यावेळी मालवण ते कसाल रस्त्यावर वाहनांची तपासणी करत असता रात्रौ रस्त्याच्या बाजूस असलेल्या एसटी निवारा शेडमध्ये कुजबूज तसेच धुरासारखा उग्र वास येत होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन व्यक्ती बसलेल्या होत्या. त्यांच्या तोंडास उग्र वास येत होता. चौकशीत त्यांनी सिगारेट मधून गांजा ओढत असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तमास फॅलीस ब्रेगान्झा, ओंकार मनोहर बांदलकर या दोन्ही संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा सदृश्य गुंगीकारक पदार्थ असलेल्या प्लास्टिकच्या दोन, पिशव्या, दोन लायटर, एक सिगरेट पाकीट सापडून आले होते. याप्रकरणी अमली पदार्थाच्या बाबतीत अन्य तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page