जिल्हा परिषद भरतीची लेखी परीक्षा ३ ऑक्टोबर पासून

ओरोस ता.१३-:

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले. ३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे. तर ४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत. ५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे. यासाठी सकाळी ८.३०, दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५.३० अशा तीन शिफ्ट ठरविण्यात आल्या आहेत.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ३३४ पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेते. एकूण १६ हजार २८७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी ४ हजार २७६ अर्ज दाखल झाले आहेत. या पाठोपाठ आरोग्य सेवक पुरुष पदांसाठी ३ हजार १ एवढे अर्ज आले आहेत.

You cannot copy content of this page