⚡मालवण ता.१३-: पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित पोईप येथील सौ. इं. द. वर्दम हायस्कुल व कला- वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाला भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने दिलेल्या आर्थिक मदतीतून बांधण्यात शकुंतला रामेश्वर अग्रवाल कलादालनाचे उदघाटन दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्या हस्ते होणार आहे.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्यावतीने पोईप येथील सौ. इं. द. वर्दम हायस्कुल व कला- वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाला विविध प्रकारे मदतीचा हात दिला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सायकल वाटप, ठिबक सिंचन व्यवस्था, झाडांसाठी खत व कृषी साहित्य, कुक्कुटपालन प्रशिक्षण व पक्षी वितरण हार्मोनियम तबला आदी संगीत साहित्य वितरण यांचा समावेश आहे
प्रशालेतील विद्यार्थ्यांची चित्रकला व संगीताची आवड लक्षात घेत भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्यावतीने दिलेल्या अडीच लाख रुपये निधीतून प्रशालेच्या शकुंतला रामेश्वर अग्रवाल कलादालनाचे नूतनिकरण करण्यात आले आहे. भगीरथ प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेल्या मदती बद्दल पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कांदळकर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. कुंभार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी व पालक यांनी डॉ. प्रसाद देवधर यांचे आभार मानले आहेत.
