⚡वैभववाडी ता.११-: करुळ गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विश्वास उर्फ बबन सावंत यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर अभिनंदन करण्यात आले.
करुळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, उपसरपंच सचिन कोलते, माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, पोलीस पाटील प्रताप पाटील, विलास गुरव, रमेश पांचाळ, रवींद्र पवार, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत तंटामुक्ती समिती नव्याने गठीत करण्यात आली.समितिच्या अध्यक्षपदी विश्वास उर्फ बबन सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रमेश कोलते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष विश्वास सावंत यांचा सरपंच नरेंद्र कोलते तसेच दिगंबर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सह्याद्री जव रक्षक संघटनेच्या वतीने देखील विश्वास सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, महिला, शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
