गोळवण सरपंच, ग्रामसेवकांचा उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मालवण, दि प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत जिल्हास्तरावर निवड झालेल्या मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष लाड व ग्रामसेवकांचा सन्मान जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कणकवली तालुक्यातील लोरे, कोळोशी, कलमठ. कुडाळ तालुक्यातून कसाल, कुंदे, माणगाव, वेंगुर्ले मधून परुळेबाजार, उभादांडा, दोडामार्गमधून कुंबल, सावंतवाडीमधून निरवडे, मळेवाड, देवगडमधून दाभोळे, बापर्डे तर वैभववाडीमधून सडूरे या गावच्या सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page