बुथ लेवल एजंट नेमण्याबरोबाच नवीन पदाधिकारी नियुक्ती करणार

शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणी बैठकीत विविध विषयांवर चर्चा

⚡कणकवली ता.०९-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदेशानुसार बुथ लेवल एजंट नेमण्याचे महत्वाचे नियोजन शिवसेना कणकवली तालुका बैठकित करण्यात आले.तसेच जे पदाधिकारी सक्रिय नसतील किंवा महत्वाच्या बैठकांना येत नसतील त्यांच्या जागी नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या.

शिवसेना कणकवली तालुका बैठक आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयभवन येथे पार पडली. यावेळी पक्षाच्या आदेशानुसार बुथ लेवल एजंट नेमण्याचे महत्वाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबाबत संदेश पारकर यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्यांनतर उपस्थित शिवसैनिकांना प्रमुख मान्यवरांनी संघटना बांधणी संदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आणि काही महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच जे पदाधिकारी सक्रिय नसतील किंवा महत्वाच्या बैठकांना येत नसतील त्यांच्या जागी नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या. प्रत्येक विभाग आणि गाव नुसार बैठका घेण्यासंदर्भात चर्चा आणि नियोजन करण्यात आले. यावेळी वरिष्ठांनी तालुक्यातील संघटनेचा गांभीर्यपूर्वक आढावा घेतला. तसेच नुतन शिवसेना फोंडा विभागप्रमुख पदी सिद्धेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव, सचिन सावंत, कन्हैया पारकर, हर्षद गावडे, राजु राठोड, भालचंद्र दळवी, उत्तम लोके, वैदेही गुडेकर, राजु रावराणे, प्रमोद मसुरकर, महेश कोदे, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, संजना कोलते, सुदाम तेली, धीरज मेस्त्री, अनिल बागवे, संतोष परब, अनुप वारंग, रुपेश आमडोसकर, विकास गुडेकर, आनंद ठाकुर, चंद्रकांत परब, निलेश सावंत, सिद्धेश राणे, दिलीप भोगले, सुरेश सुतार, प्रभाकर ताम्हणकर, एकनाथ कोकाटे, प्रविण सावंत, जगन्नाथ आजगावकर, सचिन खोचरे, सुधीर सावंत, गुरुनाथ पेडणेकर, अविनाश सावंत, सूर्यकांत तावडे, मंगेश मेस्त्री, पराग म्हापसेकर, बाबु केनी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page