एन सी सी अंतर्गत ५३ मुले, मुलींचा सहभाग
⚡मालवण ता.०८-: विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर साहसी कृत्ये करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ते करीत असताना निसर्गाचा अभ्यास, गडकिल्ल्यांचा अभ्यास करावा व कठीण परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या संकटावर मात कशी करावी या उद्देशाने मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्यावतीने रांगणागड येथे आयोजित केलेल्या ट्रेकिंग कॅम्पमध्ये एनसीसी बॉईज आणि एनसीसी गर्ल्स अशा ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवित रांगणागड सर केला .
निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतात याची जाणीव करून देण्यासाठी कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ एम आर खोत यांनी या ट्रेकिंगचे आयोजन केले. या कँपच्या नियोजनामध्ये एनसी सिनियर्स विनायक मानवर, ललिता कांदळगावकर, अभिषेक एस एस, भार्गवी तांडेल, आकाश तावडे, स्नेहा चव्हाण, सानिका गावडे, शुभम पवार, राहुल जाधव, ललित कुरले, अभिषेक परब, तसेच माजी सिनियर नारायण मुंबरकर यांनी मदत केली रांगणागड ट्रेकिंग अत्यंत खडतर प्रवास मोठा चढाव असताना देखील अगदी सव्वा दोन तासांमध्ये विद्यार्थ्यांनी हा गड किल्ला सर केला.
या ट्रेकिंग साठी प्रमुख म्हणून डॉ एम आर खोत आणि मुलींसाठी केअरटेकर जुनिअर कॉलेजच्या प्राध्यापक मिलन सामंत याही सहभागी होत्या. सकाळी मालवण मध्ये श्रीफळ वाढवून प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर यांनी ट्रेकिंगला शुभेच्छा दिल्या. कॉलेजचे ऑफिस सुप्रीडंट कैलास साळुंखे यांच्यासह प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनीही ट्रेकिंग कॅम्पला शुभेच्छा दिल्या यावेळी शिल्पा खोत, बबलू पिंटो, रुपेश लोणे, रामचंद्र काटकर, यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले तर कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर सेक्रेटरी गणेश कुशे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी एनसीसी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अशा साहसी कार्याचे कौतुक केले.
