वेंगुर्ल्यात अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

⚡वेंगुर्ला ता.०८-: सेवा परीवार आणि कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे ७ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात ६३ जणांनी लाभ घेतला. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पणही संपन्न झाले.

  डॉ.राजन शिरसाट आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला तालुक्यात एक अत्याधुनिक रुग्णवाहिका असावी जेणेकरून गरीब गरजू रुग्णांसाठी अत्यल्प खर्चात सोय होईल, त्यासाठी डॉ.राजन शिरसाट यांनी मुंबईतील दात्यांशी संफ करुन आर्थिक तरतूद केली होती. त्यातून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबई येथील सर्जन अँड गायनॅकॉलॉजिस्ट डॉ.दिलीप रायचूरा, फिजिशियन अक्नोक्नॉलॉजीस्ट डॉ.दिलीप पवार, डॉ.राजन शिरसाट, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, प्रदेश कार्यकारणी सचिव शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल व बाळा सावंत, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णू परब, माजी नगरसेवक साक्षी पेडणेकर व  प्रशांत आपटे, कवी अजित राऊळ, तुळस माजी सरपंच शंकर घारे, रविद्र शिरसाट, कीर्तनकार चंद्रशेखर अभ्यंकर, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावले, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत, जयंत मोंडकर, सुनील नांदगावकर, व्यापारी संघाचे अशोक ठोंबरे, कुंभारटेंब मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल, जेष्ठ नागरिक अनंत आठले, डॉ.शिरसाट, राष्ट्रसेविका समिती कोकण पांत सहकार्यवाह पद्मजा अभ्यंकर, साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील, विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद पिंजाणी, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, राहुल वरस्कर, सायमन अल्मेडा, डॉ.दर्शेश पेठे, मनवेल फर्नांडिस, अमोल आरोसकर यासंह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांत कांदिवली मार्फत भारत माता व शिवाजी महाराज प्रतिमा उपस्थितांना देण्यात आल्या. यावेळी डॉ. दिलीप रायचुरा व डॉ.दिलीप पवार यांचा डॉ.राजन शिरसाट यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय रेडकर यांनी मानले.
You cannot copy content of this page