बांध्यात उद्या भाजपची दहीहंडी रंगणार

राजन तेलींचा पुढाकार:1 लाख 11 हजार 111 रुपयाचं बक्षीस;भाजप नेत्यांसह सिनेकलाकार राहणार उपस्थित..

⚡बांदा ता.०८- भाजप नेते माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धा ही उद्या रंगणार असून त्या पार्श्वभूमीवर बांद्यात भाजप कडून जोरदार तयारी सुरू आहे. तब्बल १ लाख 11 हजार 111 चे बक्षीस तर दुसरे बक्षीस 55 हजार 555 ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा बांदा मच्छी मार्केट पटांगण येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

यावर अधिक माहिती अशी की भाजपने ते राजन तेली यांच्या माध्यमातून उद्या बांधा येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या विविध मान्यवर तसेच सिने कलाकार व गायक उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक ऋषिकेश देसाई करणार आहेत तसेच यावेळी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page