गोविंदा रे गोपाळा…मच गया शोर सारी नगरी रे…

कणकवलीत दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा लुटला आनंद

कणकवली 7 सप्टेंबर (प्रतिनिधी)-
गोविंदा रे गोपाळा…मच गया शोर सारी नगरी रे… अशा तालावर कणकवली शहरातील विविध मंडळांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा आनंद लुटला. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे रचताना आणि ते पडतानाचे क्षण पाहण्यासारखे होते. दरम्यान, श्रीकृष्णाच्या मूर्तीनी विसर्जन मिरवणूकीत आचरेकर कुटुंबीयांनी तयार केलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत. कणकवली शहरातील स्टार महापुरुष, गणपती मंदिर समोर महापुरुष मित्र मंडळ बाजारपेठ, युनियन बँक समोर आंबेवाडी मित्र मंडळ, संदेश पारकर यांच्या घरासमोर बाजारपेठ मित्र मंडळ, ढालकाठी मित्र मंडळ, पटकीदेवी मित्र मंडळ यासोबतच शहरात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचण्याचा अनुभव नागरिकांना पाहता आला. मानवी मनोरे रचण्यामध्ये युवकांचा सहभाग मोठ्या संखेने होता. शहरातील लगतच्या गावामध्ये देखील दहीहंडी फोडण्याचा उत्साह आणि आनंद मोठा होता. दरम्यान दहीहंडी फोडताना वरुणराजाने लावलेल्या हजेरीने बाल गोपाळांचा आनंद द्विगुणीत झाला.

You cannot copy content of this page