कुडासेत बंद घरातील ७० हजार रुपये चोरीस

दिवसाढवळ्या कौले काढून घरात प्रवेश; कपाट फोडले

⚡दोडामार्ग,ता.०७-: कुडासे भरपालवाडी येथे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्याने ७० हजार रुपयांवर डल्ला मारला.घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेवून त्या चोरट्याने संजना संजय धुरी (वय ४४) यांच्या घरातील स्वयंपाकगृहाला लागून असलेल्या खोलीच्या छापरावरील कौले काढून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि बेडरूम मधील कपाटात ठेवलेले रोख ७० हजार रुपये लंपास केले.श्रीमती धुरी यांनी काजू,सुपारी विकून आणलेली रक्कम,तसेच गाडी भाड्याची व हातखर्चाची रक्कम असे १०० व ५०० रुपयांच्या नोटा मिळून ७० हजार रुपये कपाटात ठेवले होते.त्यावरच चोरट्याने डल्ला मारला.पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

You cannot copy content of this page