⚡दोडामार्ग ता.०७-: बेरोजगार हातांना काम मिळावे म्हणून आडाळी एमआयडीसीमध्ये कारखाने व विविध प्रकल्प यावेत यासाठी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवले होते.त्याची दखल सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकाऱ्यांनी घेतली आणि पर्यटन विभागाच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या विषयासंदर्भात तत्काळ बैठक लावण्याची सूचना केली आहे.
आडाळी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवून कैक वर्षे झाली; पण अद्याप एकही उद्योग आलेला नाही.त्यामुळे बेरोजगार युवकांना काम मिळत नाही.काम मिळावे म्हणून त्यांना गोव्याचा रस्ता धरावा लागतो.ती परिस्थिती बदलावी,इथल्या तरुणांना इथेच काम मिळावे यासाठी श्री.दळवी यांनी उद्योग यावेत यासाठी कार्यवाही करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री उदय सावंत यांच्याकडे केली आहे.त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठक लावण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या नायब तहसीलदारांनी पर्यटन विभागाला पत्र पाठवून तत्काळ बैठक लावण्यास कळविले आहे.
भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवींच्या पत्राची दखल
