बाहेरचावाडा येथील शकील बागवान यांचे ह्रदयविकाराच्या धक्काने निधन…

सावंतवाडीत केळ्याचे घाऊक विक्रेते म्हणून होती ओळख: हज यात्रेवरुन परताच निधन..

⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील फळ मार्केटमधील प्रसिध्द केळ्याचे घाऊक व्यापारी शकील कादर बागवान (वय 60) रा.बुराणगल्ली यांचे बुधवारी रात्री ह्रदय विकाराच्या धक्काने निधन झाले. ते गेली 35 वर्षे सावंतवाडी फ्रुट मार्केटमध्ये आपला व्यापार उत्तमरीत्या करीत होते सर्व धर्म समाजातील सर्वांसोबत मनमोकळेपणाने मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते बुधवारी सकाळी नुकतेच हज यात्रेला जाऊन बारा वाजता हज यात्रे वरून आपल्या घरी आले होते मध्यरात्री दोन तीस वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली जाण्याने शोक व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page